आसाम – विषारी दारूमुळे मृत पावलेल्यांचा आकडा 127 वर 

गुवाहटी –  आसाममधील गोलाघाट आणि जोहरहाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने मृंताच्या आकड्यात वाढ होऊन  127 जणांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. गुरुवारी (21 फेब्रुवारी) रोजी दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडल्यानंतर ही घटना समोर आली होती. शनिवारपर्यंत हा आकडा 94 पर्यंत होता.

आसामच्या वैद्यकीय विभागाने याबाबत माहिती दिली आहे. माहितीनुसार, विषारी दारू प्यायल्याने अनेकांची अचानक तब्येत बिघडली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना 127 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेप्रकरणी जिल्ह्यातील दोन उत्पादन अधिकाऱ्यांच निलबंन करण्यात आलं आहे. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)