ख्रिसमसच्या आनंदावर विरजण : तेलंगणमधील तीन भावंडांचा अमेरिकेतील आगीत मृत्यू

वॉशिंग्टन: अमेरिकेतील टेनेस्सी प्रांतामध्ये ख्रिसमस निमित्त झालेल्या आनंदोत्सवादरम्यान लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये भारतातील एक महिला आणि तीन भावंडांचा समावेश आहे. हे कुटुंब टेन्नेस्सी भागामधील मेम्फिस या उपनगरामध्ये सुटीसाठी रहायला आले होते, असे एका वर्तमानपत्राने म्हटले आहे.

टेन्नेस्सीमधील कोलीर्वेल या भागातील कारी कौड्रेट यांच्यासह नाईक कुटुंबातील शेरोन (वय 17), जॉय (वय 15) आणि ऍरोन (वय 14) या तिघा भावंडांचा आगीत मृत्यू झाला. नाईक कुटुंब भारतातील मिशनरी आहेत, असे स्थानिक वर्तमानपत्राने कॉड्रीफ चर्चच्या हवाल्याने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉड्रेफ कुटुंब रहात असलेल्या भागात ही आग 23 डिसेंबरच्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास लागली. त्यावेळी कॉड्रेफ कुटुंब नाईक कुटुंबातील मुलांसमवेत ख्रिसमसचा आनंद साजरा करत होते. कारी कौड्रेट यांचे पती डॅनी आणि त्यांचा मुलगा कोल हे घरातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. मात्र कारी कौड्रेट आणि नाईक कुटुंबातील तिन्ही भावंडे आग लागलेल्या घरात अडकली. ही मुले मिसिसीपीमधील फ्रेंच कॅम्प ऍकेडमीमध्ये शिकत होती. शाळेला सुटी लागल्यामुळे ते कौड्रेट कुटुंबाकडे रहायला आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)