बिहारमध्ये मॉब लिंचिंगच्या घटनेत तिघांचा मृत्यू

जनावर चोरी केल्याच्या संशयातून जमावाने केली मारहाण

पाटना : बिहारमध्ये मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. छपरा येथे जनावर चोरी केल्याच्या संशयातून जमावाने तिघांची बेदम मारहाण करत हत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, छपरा येथील बनियानपूर येथे शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी चार जणांना चोरीच्या संशयातून पकडलं होतं. यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना यासंबंधी कोणतीही माहिती न देता त्यांच्यावर हल्ला केला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण इतकी करण्यात आली होती की दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)