नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात असंख्य पक्ष्यांचा मृत्यू

नाशिक: महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात मंगळवारी असंख्य पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या धक्‍कादायक प्रकारानंतर प्राणीमित्र आणि पक्षीप्रेमींनी संताप व्यक्‍त करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या मांजरगाव परिसरात अज्ञात मासेमारी करणाऱ्यांनी जाळे टाकले होते. यात सुमारे 17 ते 18 पक्षी अडकून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या पक्ष्यांमध्ये कॉमन क्रेन 1, कॉमन कुट 2, डार्टर 2, ग्रेटर कॉरमोनंट 3, लिटल कॉरमोनंट एक आणि डक 1 असे एकूण 18 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. नांदूर मधमेश्वरचे रेंज वनअधिकारी भगवान ठाकरे व अधिकारी अशोक काळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तसेच अज्ञात मासेमारी करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो, त्याप्रमाणे नांदूर मधमेश्वर हे “पक्षीतीर्थ’ आहे. या अभयारण्यात करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणातून येथे 240हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहेत. येथील जलाशयात 24 जातीचे मासे आहेत. परिसरात 400 हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)