हिज्बुलच्या गनिमाचा खात्मा

file photo

श्रीनगर – हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेच्या एका गनिमाचा आज पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला. या जिल्ह्ह्यातील बाबगंद भागातल्या जंगलात काहीं दहशतवादी जमले असल्याची खबर सुरक्षा दलांना लागली. त्यानुसार त्यांनी तेथे शोध मोहीम हाती घेतली त्यावेळी ही चकमक झाली. दोन्ही बाजुंकडील ही चकमक बराच वेळ सुरू होती.

ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव साबीर अहमद दर असे आहे तो हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेशी संबंधीत होता. एवढीच माहिती त्याच्याविषयी उपलब्ध झाली आहे. चकमकीनंतर त्याचे अन्य साथीदार मात्र फरारी झाले. त्यांचाही शोध घेतला जात आहे. साबीर अहमदवर पुर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत काय याचीही माहिती घेतली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)