न्यूझीलंड मधील हल्यात पाच भारतीयांचा मृत्यु

ख्राईस्टचर्च  – येथील दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यातील एकूण 50 मृतांमध्ये पाच भारतीयांचा समावेश असल्याचे भारतीय उच्चायुक्ताने रविवारी जाहीर केले आहे. ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या ब्रेन्टन टारन्ट या माथेफिरुने शुक्रवारी नमाजानंतर ख्राईस्टचर्च येथील दोन मशिदींवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यामध्ये किमान 50 जण प्राणाला मुकले.

भारतीय उच्चायुक्तांनी ट्‌वीटरवर रविवारी (हॅशटॅग ख्राईस्टचर्च) दिलेल्या संदेशानुसार, अत्यंत जड अंत:करणाने आम्ही जाहीर करत आहोत की, शुक्रवारच्या मशिदींवरेल हल्ल्यात पाच भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मेहबूब खोखर, रमिझ व्होरा, असिफ व्होरा, अन्सी अलिबाबा आणि ओझर कादीर अशी या पाच जणांची नावे आहेत. तसेच न्यूझीलंड सरकारने हल्ल्यात बळी पडलेल्या अथवा जखमी झालेल्यांचा नातेवाईकांना व्हिसा त्वरीत मिळण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर एक स्वतंत्र लिन्क प्रसिद्ध केली आहे. तसेच मृत भारतीय नागरिकांना उच्चायुक्तालयातर्फे श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली आहे.

भारताचे न्यूझीलंडमधील उच्चायुक्त संजीव कोहली यांनी, शुक्रवारच्या हल्यानंतर एका ट्‌वीटर संदेशाद्वारे, नऊ भारतीय बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी जखमी अथवा मृतांचा अधिकृत आकडा प्रसिद्ध झाला नव्हता. आता कोहली यांनी भारतीय नागरिकांच्या सोयीसाठी मदत कक्षाचे दूरध्वनी क्रमांकही प्रसिद्ध केले असून त्यानुसार 021803899 अथवा 021850033 या क्रमांकावर इच्छुकांना संपर्क साधता येवू शकेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)