भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

शिरवळ   – पुणे-बेंगलोर महामार्गावर दुचाकी घसरुन दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांची मृत्यू झाला आहे. अशोक दत्ताराम गावकर (वय 50, रा. कोळीवाडी, मुंबई) व आनंद दिवाकृष्ण जाधव महाराज (वय 42, रा. प्रभादेवी, मुंबई) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, अशोक गावकर आणि आनंद जाधव हे गुरुपौर्णिमेसाठी कराडला जाण्यासाठी सोमवारी रात्री दहा वाजता मुंबईहून दुचाकीवरुन निघाले होते. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते शिरवळ गावच्या हद्दीमध्ये आले असताना त्यांची दुचाकी महामार्गावरुन घसरली आणि दुभाजकावर जाऊन आदळली.

यावेळी पाठीमागून आलेल्या एका खाजगी बसचालकाने बस थांबवून तात्काळ रुग्णवाहिकेला पाचरण केले. मात्र दुचाकी चालक अशोक गावकर यांचा जागीच मृत्यू झाला तर आनंद जाधव यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद बसचालक रुमीद विनायक जाधव (रा.सारोळा जि. पुणे) यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. एच. भोईटे व पोलीस हवालदार धीरज यादव हे करीत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)