पुणे-मुंबई महामार्गावर दोघांचा मृत्यू

चार जण जखमी : कामशेत हद्दीत मोटार अपघात

कामशेत – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील मुंबईच्या दिशेने निघालेल्या मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावर मोटार आदळून दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार गंभीर जखमी झाले आहेत. कामशेत हद्दीतील दर्शन ढाब्यासमोर गुरुवारी (दि. 23) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली.

मनोज मल्लाप्पा प्याटीस (वय 28, रा. शांतीनगर, येरवडा, पुणे), तेजस प्रकाश सोनवणे (वय 23, लोहियानगर, पुणे) असा अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर अक्षय विलास खाजगे (वय 23, रा. शांतीनगर, येरवडा, पुणे) राम हनुमंत दुब्बल (वय 20, रा. शांतीनगर, येरवडा, पुणे), चालक पक्षुराम कृष्णय्या कोळी (वय 23, रा. ताडीवाला रोड, पुणे) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या मोटारीतील चालक रोहित नंदकिशोर दोडकेकर (वय 31, रा. रहाटणी, काळेवाडी) हा जखमी झाला आहे. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील गुरुवारी (दि. 23) सायंकाळी पुण्याहून मुंबईकडे वेगात निघालेली मोटार (एम. एच. 12 टी. वाय. 7864) कामशेत खिंड उतरताना चालकाचा ताबा सुटल्याने मोटार मुंबई लेनच्या दुभाजकावर आदळली. त्यानंतर पुणे लेनवरून पुण्याकडे निघालेल्या दुसऱ्या मोटारीवर (एम. एच. 12 के. एन. 9889) येऊन धडकली. या अपघातात मुंबईकडे निघालेल्या मोटारीतील मनोज प्याटीस, तेजस प्रकाश सोनवणे या दोघांचा मृत्यू झाला. तर अक्षय खाजगे, राम दुब्बल, चालक पक्षुराम कोळी आणि पुण्याकडे निघालेल्या मोटारीतील चालक रोहित दोडकेकर हे जखमी झाले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here