पुणे – विंगा अंगावर सहायकाचा मृत्यू

पुणे – कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हॅम्लेट नाटकाच्या “शो’नंतर विंगा काढण्याचे काम सुरू असताना जड विंगा अंगावर पडून महानगरपालिकेच्या रंगमंच सहायकाचा मृत्यू झाला. विजय महाडिक (वय 45 रा.) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा प्रकार शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी हॅम्लेट नाटकाचा शो असल्याने स्टेज सेटअपचे काम सुरू होते. हॅम्लेट नाटकाचा सेट मोठा असल्याने विंगा काढाव्या लागत होत्या. म्हणून रात्री त्या काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानकच सहा ते सात विंगा खाली पडल्या. त्याखाली महाडिक सापडले गेले. विंगांचे वजन जास्त असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी दोन कर्मचारी त्यांच्या समवेत होते. मात्र, ते या अपघातात बचावले. महाडिक हे गेले चार वर्षांपासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगमंच सहायक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आचानक जाण्याने नाट्यगृह कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)