तामीळनाडूमधील अपघातात अण्णाद्रमुक खासदाराचा मृत्यू

चेन्नई – तामीळनाडूत शनिवारी झालेल्या रस्ते अपघातात त्या राज्यातील सत्तारूढ अण्णाद्रमुकचे खासदार एस.राजेंद्रन मृत्युमुखी पडले. राजेंद्रन यांच्या कारची धडक रस्ता दुभाजकाला बसली. त्या अपघातात ते जागीच मृत्युमुखी पडले. तर जखमी झालेल्या कारचालक आणि राजेंद्रन यांच्या नातलगाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची माहिती प्राथमिक चौकशीतूून पुढे आली. राजेंद्रन (वय 62) लोकसभेत विल्लूपूरम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. ते अण्णाद्रमुकच्या शेतकरी शाखेत सक्रिय होते. राजेंद्रन यांच्या निधनाबद्दल तामीळनाडूचे मुख्यमंत्री के.पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)