पुण्याच्या महिलेचा सुरुरमध्ये अपघाती मृत्यू

भुईंज – सुरुर ता. वाई येथील धावजी पाटील मंदिरात देवदर्शनासाठी पुणे खडकी येथून आलेल्या महिलेचा अपघाती मृत्यु झाला आहे. हौसाबाई बबन हारदे (वय 45, रा. खेड, पुणे) असे मयत महिलेचे नाव आहे. आज सकाळी मैनाबाई दिलीप ठाकर (वय 40) आणि हौसाबाई बबन हारदे (वय 45) या दोघी मांढरदेवीच्या दर्शनासाठी खेड पुणे येथून आल्या होत्या.

तेथील देव दर्शन उरकून त्या वाईमार्गे सुरुर ता. वाई येथील धावजी पाटील मंदिरात देवदर्शन उरकून त्या रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा पुण्याला जाण्यासाठी दोघीही निघाल्या. त्या पुणे सातारा महामार्ग ओलांडून सातारा पुणे महा मार्गावरील तीन नंबर लेन वर आल्या असता पाठीमागुन भरघाव वेगात आलेल्या माल ट्रकने हौसाबाई बबन हारदे यांना जोराची धडक दिल्याने त्या 20 ते 25 फुट उंच उडाल्या आणि पुन्हा महामार्गावर आदळल्याने डोक्‍यातील मेंदू बाहेर पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

-Ads-

या अपघाताची माहिती सुरुर गावच्या महिला पोलीस पाटील सौ. निर्मला पवार यांनी भुईंज पोलीस ठाण्यात कळविले. अपघाताची माहिती हवलदार चंद्रकांत मुंगसे यांना मिळताच ते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून मालट्रक व चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास हवलदार चंद्रकांत मुंगसे करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)