शिक्रापूर – सणसवाडी (ता. शिरूर) येथे पुणे- नगर रस्त्याच्या कडेला असलेल्या कल्पेश वजन काटाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल अर्जुन आर्डे (वय 34, रा. कार्जीडा पोस्ट पाचल, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर किशोर अर्जुन आर्डे (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे.
सणसवाडी येथील एका हॉटेलमध्ये काम काम करणारा अनिल आर्डे हा शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे- नगर रस्त्यावरून जात रस्ता ओलांडत होता. त्यावेळी त्याला एका वाहनाची धडक बसली. त्यात अनिल हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी त्याचा मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात हलविला. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.