नाशकात तिसऱ्या मजल्यावरुन पडून चिमुकल्याचा मृत्यू

नाशिक: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरुन पडून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. नाशिकमधील “शिरीन हाईट्‌स’मधून अंशुमन याचा तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून खेळता-खेळता तोल जावून पडल्याने तो गतप्राण झाला.

अंशुमनचे वडील अजय शर्मा कामानिमित्त घराबाहेर पडले. साडेतीन वर्षांचा अंशुमन आपल्या वडिलांना निरोप देण्यासाठी गॅलरीत आला. टाटा-बाय बाय करुन तो गॅलरीतच खेळत बसला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसरीकडे त्याची आई घरात टीव्ही बघत होती. तेवढ्यात गॅलरीत खेळता खेळता अचानक अंशुमनचा तोल गेला आणि तो तिसऱ्या मजल्यावरुन थेट खालील गेटवर पडला. यामुळे त्याच्या डोक्‍याला गंभीर इजा झाल्याने जागीच मृत्यू झाला.

शर्मा कुटुंबीय दोन महिन्यांपूर्वीच अंबडच्या शिरीन हाईट्‌समधील नव्या फ्लॅटमध्ये राहायला आले होते. मात्र त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीला बसवण्यात आलेला लोखंडी कठडा कमी उंचीचा होता आणि हेच अंशुमनच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. घराच्या बाल्कनीतून पडून चिमुरड्याचा मृत्यू होण्याची नाशिकमधील तिसरी घटना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)