अमेरिकेत पाच मुलांच्या हत्या प्रकरणी पित्याला फाशी

वॉशिंग्टन: अमेरिकेतल्या अल्बामा प्रांतात एका इसमाने आपल्या पाच मुलांची हत्या केल्याच्या प्रकरणात पित्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा इसम संगणक अभियंता आहे. त्याने अत्यंत क्षुल्लक कारणावरून आपल्या पाचही मुलांना मारून टाकले होते. त्याने या मुलांचे मृतदेह नऊ दिवस आपल्याच घरात ठेवले होते व नंतर त्याने ते अलबामा प्रांताच्या पर्वतराजीतील कचरा कुंडीत नेऊन फेकण्याचा प्रयत्न केला त्यावेळी पकडला गेला. त्याने आपल्या मोटार कार मध्ये हे मृतदेह ठेऊन तो त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी निघाला होता. वाटेत एका चेकपॉईन्टवरील पोलिसांना त्याच्या गाडीतील विचीत्र वासाचा संशय आला. त्यामुळे त्याने गाडीची संपुर्ण तपासणी केली असता त्यांना हे मृतदेह आढळून आल्याने त्याला तातडीने अटक करण्यात आली.

तिमोथी जोन्स असे या नराधाम पित्याचे नावे आहे. तो 37 वर्षांचा आहे. सन 2014 मध्ये त्याने हे कृत्य केले. त्याने ठार मारलेली मुले 1 ते 8 वर्ष वयोगटातील होती. त्याच्या वर साऊथ कॅरोलिना प्रांतातील कोर्टात खटला चालला. त्याला कोर्टाने आज दोषी ठरवल्यानंतर त्याच्या पत्नीने कोर्टातील सर्वच उपस्थितांना धक्का देत या इसमाला फाशी देण्यात येऊ नये अशी मागणी केली. ती म्हणाली की हा इसम नराधाम निघाला असला तरी त्याच्या मुलाचे त्याच्यावर प्रेम होते व त्याला जगण्याची संधी द्यावी ही मागणी आपण आपल्या मुलाच्यावतीने करीत आहोत असे तिने कोर्टाला सांगितले. पण कोर्टाने त्याची फाशी कायम ठेवली. आपला सहा वर्षाचा मुलगा आपल्या माजी पत्नीच्या संगनमताने आपल्या विरोधात काही कट रचत असल्याच्या कारणाने त्याने प्रथम आपल्या त्या सहा वर्षाच्या मुलाला आणि नंतर उर्वरीत चारहीं मुलांना मारून टाकले. आपण स्क्रीझोफेनियाचे रूग्ण आहोत त्यामुळे आपल्यावर खटला चालू शकत नाही असा युक्तिवाद त्याने कोर्टात केला होता. तोही कोर्टाने अमान्य केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)