भारत जर आता जिंकला नाही तर कधिच जिंकणार नाही : डिन जोन्स

सिडनी – भारतीय संघ सध्या आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून जर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकू शकला नाही. तर, भविष्यात पुन्हा कधीच हा संघ येथे कसोटी मालिका जिंकू शकणार नाही. असे मत ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार डिन जोन्स यांनी सिडनी येथे बोलताना केले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, मागिल काही काळा पासून ऑस्ट्रेलियाचा संघ काही कारणांमुळे दबावात आहे तसेच संघातील प्रमुख खेळाडू स्टिव्ह स्मीथ आणि डेव्हिड वॉर्नरहे संघात नसल्याकारणाने सध्यातरी ऑस्ट्रेलियन संघापेक्षा भारतीय संघ वरचढ भासतो आहे. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियात आपली पहिली कसोटी मालिका जिंकण्याची ही सुवर्णसंशी असणार आहे. जर, या मालिकेत भारतीय संघ पराभूत झाला. तर, भविष्यात पुन्हा भारतीय संघ विजयी होऊ शकणार नाही.

-Ads-

तसेच यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियन संघाला घरच्या मैदानावर पराभूत करणे शक्‍यतो अशक्‍यच असते. मात्र, सध्या संघातील स्मिथ आणि वॉर्नरहे दोन खेळाडू नसल्याने ऑस्ट्रेलियन संघ पिछाडीवर आहे. कारण ते दोघे सध्या संपुर्ण संघाच्या धावांच्या 40 टक्‍के सरासरी धावा करतात त्यामुळे सध्या त्यांची अनुपस्थिती ही संघाला जाणवेल. असेही ते यावेळी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)