कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे अपघातात ज्येष्ठाचा मृत्यू

पिंपरी -कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा रेल्वे गाडीतून पडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.

पिंपरी रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. मयताची अद्याप ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे 60 वर्ष, वर्ण निमगोरा, मध्यम बांधा, हाताच्या मनगटावर हनुमान असे कोरलेले, अंगावर पांढऱ्या रंगाचा शर्ट त्यावर काळ्या रेषा, आकाशी रंगाची पॅन्ट असे त्याचे वर्णन असून संबंधीत व्यक्तीची ओळख पटल्यास नागरिकांनी पिंपरी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)