डेविड विली वैयक्तिक कारणास्तव आयपीएलमधून माघार

चेन्नई: चेन्नई संघाचा अष्टपैलू खेळाडू डेविड विली वैयक्तिक कारणास्तव संघातून माघार घेतली आहे. यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्‍लब वेबसाइटशी बोलताना डेविडने सांगितले की, माझे दुर्भाग्य आहे. मला वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घ्यावी लागली आहे.

माझी पत्नी दुसऱ्यांदा बाळाला जन्म देणार आहे. तीची पकृती स्थिर नसल्याने माझी तिथे असणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे मी संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तो पुढे म्हणाला, चेन्नई संघाने मला खूप मदत केली आहे. त्यामुळे अशा प्रकारे माघार घेणे कठीण होते पण हाच योग्य निर्णय आहे. डेविड विली पूर्वी दक्षिण अफ्रिकेचा जलद गोलंदाज लुंगी एनगिडी जखमी झाल्याने संघातून बाहेर आहे. एनगिडीच्या जागी न्युझीलंडचा युवा जलदगती गोलंदाज स्कॉट कुगलेजिनला संघात स्थान दिले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)