‘दौंड-जामखेड’ रस्त्यावर धुळीचे साम्राज्य

नागरिकांसह दुकानदार, वाहनचालक त्रस्त

श्रीगोंदे – श्रीगोंदे शहरातून जाणाऱ्या दौंड-जामखेड रस्त्याचे काम नगरपरिषदेने सुरू केले आहे. या रस्त्यावर असणारे जुने दुभाजक काढण्याची घाई ऐन दिवाळीच्या तोंडावर नगरपरिषदेने केली. त्यामुळे वरील रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर या धुळीच्या लोटाने नागरिक व दुकानदार वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे.

श्रीगोंदे शहराला जोडणाऱ्या 17 रस्त्यांचे काम नगरपालिका करीत आहे. यातील सर्वाधिक वर्दळीच्या दौंड-जामखेड रोडचे काम नगरपरिषदेने सुरू केले आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ठेकेदाराने जुने दुभाजक व विद्युत पोल महिन्यांपूर्वी काढून टाकले. त्यानंतर ऐन दीपावली डोळ्यासमोर ठेवून कामाचा पुढील सोपस्कार करणे गरजेचे होते. दरम्यानच्या काळात या रस्त्याकडे ठेकेदाराने ढुंकूनही पाहिले नाही.

“33 कोटींची कामे सध्या शहरांमध्ये चालू आहेत. काम चालू होऊन दीड वर्षांचा कालावधी होत आला. तरीही या प्रमुख रस्त्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही. या रस्त्याने जाणे-येणेदेखील कठीण झाले आहे. नागरिकांना धुळीने काही आजार होऊ नये, म्हणून आम्ही एक हजार मास्कचे वाटप केले आहे.
– टिळक भोस ,जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

सिमेंटचे दुभाजक काढल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य बनले आहे. दीपोत्सवातदेखील या रस्त्यावर अंधार तर पसरला आहेच, शिवाय धुळीने नागरिकांना, प्रवाशांना व रस्त्याच्या दुतर्फा असलेले दुकानदार प्रचंड त्रस्त झाले आहेत. नगरपरिषदेने या रस्त्यावर किमान पाण्याचा सडा तरी, मारावा अशी मागणी दुकानदार अरविंद गांजुरे यांनी “प्रभात” शी बोलताना व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)