किरकोळ वादातून सासूची निर्घृण हत्या

नवी मुंबई- नालासोपारा येथे घरातील किरकोळ वादातून सुनेने सासूची निर्घृणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना नालासोपारा पूर्व अवघनगर पडखळकळ पाडा आचोले डोंगरी इथे काल (10 ऑगस्ट) संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली.

गौरी चांदरशेखर वर्मा (वय 45) असे हत्या झालेल्या सासूचे नाव आहे. याप्रकरणी प्रीती नंदन वर्मा (वय 23 वर्ष) असे हत्या करणाऱ्या सुनेचे नाव आहे.

-Ads-

सासू-सुनेचा घरातील किरकोळ कारणावरुन वाद झाला. याच वादातून सुनेने धारदार शस्त्राने वार करुन सासूची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी तुलिंज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करुन सुनेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)