डेटाच्या सुरक्षेशी तडजोड नाही : रवी शंकर प्रसाद

नवी दिल्ली : भारतात होणाऱ्या डिजिटल व्यवहाराच्या सुरक्षेबाबत भारत सरकार कायदा करणार आहे. भारताला डिजिटल व्यवहार हवे आहेत. मात्र भारत माहितीच्या म्हणजे डेटाच्या सुरक्षेबाबात काही तडजोड करणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे.

भारतीय मोबाइल कॉग्रेस या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले की, मोबाइल तंत्रज्ञानात भारत जगाच्या बरोबरीने आहे. त्याचबरोबर अगामी काळातही भारत या क्षेत्रात अग्रेसर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेसमध्ये देशभरातील लोकांवर विविध मार्गांनी फाइव्ह जीचा कशा प्रकारे परिणाम होईल. घर, मैदाने, रस्ते व शेतावरील लोकांचे डिजिटल आयुष्य सेवांद्वारे कशाप्रकारे उंचावेल यांची कारणमीमांसा यावेळी केली जाणार आहे.
डिजिटल इंडियापासून प्रेरणा घेत आणि फोर जी स्थित्यंतरामुळे नवनवे तंत्रज्ञान आपलेसे करण्याकडे असलेला कल वाढल्याचे पाहात आहोत, असे सॅमसंग इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या नेटवर्क बिझनेस विभागाचे अध्यक्ष योंग्की किम म्हणाले आम्ही यापुढेही सरकारच्या डिजिटल इंडिया मिशनमध्ये सहभागी राहाणार आहोत, दिवाळीमध्ये सॅमसंग 99 टक्के भारतीय लोकसंख्येपर्यंत म्हणजेच 1.3 अब्ज लोकांपर्यंत फोर जी एलटीई सेवा पोहोचवेल. फोरजी आणि फाइव्हजी यांच्यात पूल उभारण्यासाठी सॅमसंग उद्योगक्षेत्राचे नेतृत्व करत आहे. सॅमसंग सर्वाधिक मोठ्या पातळीवरील फाइव्ह जी चाचणी घेण्याचे नियोजन करीत असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)