डॅनीचा मुलगा ‘रिंजिंग’ लवकरच करणार ‘बाॅलिवूड’मध्ये एन्ट्री

मुंबई – बाॅलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता डॅनी डेन्जोंग्पाचा मुलगा रिंजिंग लवकरच बाॅलिवूडमध्ये एन्ट्री घेतोय. रिंजिंग हा एका इमोशनल अॅक्शन थ्रीलर चित्रपटातून डेब्यू करणार आहे, अशी माहिती खुद्द डॅनी यांनी दिली आहे.

चित्रपटाचे शूटींग पुढील वर्षी सुरू होणार आहे.रिंजिंगच्या डेब्यू चित्रपटाचे नाव स्काॅड असे अाहे, या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन असणार आहे.

-Ads-

डॅनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘रिंजिंगला अखेर एक स्क्रिप्ट आवडलीय आणि यामुळे मी प्रचंड आनंदात आहे. आमचा मुलगा बॉलिवूडमध्ये करिअर करू इच्छितो, ही आमच्या कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी रिंजिंगला त्याच्या डेब्यूसाठी कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही’.

पुढे बोलताना डॅनी म्हणाले, ‘चित्रपट क्षेत्रात रिंजिंग आपले स्थान निर्माण करेल, जे काही करेल, त्याला पूर्ण न्याय देईल, असा मला विश्वास आहे. हा एक थ्रीलर चित्रपट असणार आहे. ज्यामध्ये काॅमेडी आणि इमोशन्ससुध्दा पहायला मिळणार आहे’.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)