लग्नादरम्यान केलेल्या गोळीबारात डान्सर तरुणीचा मृत्यू

पाटना – बिहार राज्यातील सहरसा येथे एका विवाहसोहळ्यात बंदुकीची गोळी हवेत झाडणे तरुणीच्या जीवावर बेतले आहे. विराटपूर गावातील लग्नादरम्यान एका व्यक्तीने आनंदाच्या भरात हवेत गोळीबार केला. परंतु ती गोळी मंचावर नाचणाऱ्या एका तरुणीच्या डोक्‍यात घुसल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. मधू उर्फ आकृती असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. सोनवर्षा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील गावात एक लग्न होते.

या लग्नात डान्सर मधू उर्फ आकृती एका भोजपुरी गाण्यावर नाचत होती. त्याचवेळी लग्नाला आलेले काही लोक नोटांचे बंडल हवेत उडवून त्यावर गोळी मारत होते. एका इसमाने नोटांचा बंडल हवेत उडवला, तो त्यावर गोळीबार करत होता. परंतु त्याच्या बंदुकीतून सुटलेली गोळी थेट डान्सर मधूच्या डोक्‍यात घुसली. गोळी लागताच मधू जागेवर कोसळली. ही घटना शुक्रवारी घडली आहे. परंतु पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करण्यास दिरंगाई केली असल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. याप्रकरणी विराटपूरच्या पोलीस अधीक्षकांनी सोनवर्षा पोलीस ठाण्याचे फौजदार सुमन कुमार यांना तात्काळ निलंबित केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)