आंबेगाव-शिरूर तालुक्‍यात पाण्याअभावी पिकांचे नुकसान 

परिसरात उसासह इतर पिकेही जळू लागली : शेतकरी चिंतातुर 

मंचर – आंबेगाव-शिरुर तालुक्‍यातील सुमारे 70 गावांना उजव्या कालव्यातील पाण्याचा फायदा होतो. सद्यःस्थितीत डिंभा उजव्या कालव्याला पाणी नाही, त्यामुळे हजारो एकरातील शेती पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. या कालव्याला त्वरीत पाणी सोडावे, अशी मागणी आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात घोडनदी आणि डिंभा उजवा कालव्याचे पाणी आवर्तनानुसार सोडले जात असल्याने बहुतांशी शेती बागायती झाली आहे. पारगाव येथे भीमाशंकर साखर कारखाना झाल्याने तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड वाढली आहे. याबरोबरच पूर्व भागातील शेतकरी कोबी, वांगी, फ्लॉवर, बीट, काकडी, टोमॅटो आदी नगदी, पैसे मिळवुन देणारी पिके घेत आहेत. त्याचप्रमाणे जनावरांचा हिरवा चारा, मका, कडवळ, गवत केले जाते; परंतु जून महिन्यापासुून अद्यापपर्यंत एकदाही मोठा पाऊस न झाल्याने येथील परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

दोन महिन्यांपूर्वी डिंभा उजवा कालवा आणि घोडनदीला डिंभा धरणातून पाणी सोडल्याने विहिरीत थोड्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे मिळवून देणारी नगदी पिके घेतली आहेत; परंतु आता पावसाळा संपत आला तरी अद्याप पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही गंभीर होऊ लागल्याने जलसंपदा विभागाने डिंभा उजव्या कालव्याला पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

ऊस पिकाचे सर्वाधिक नुकसान 

उसाची पूर्ण वाढ झाली आहे; परंतु आता पावसाची नितांत गरज असल्याने पावसाअभावी ऊस सुकू लागल्याने उसाचे वजन कमी होऊ लागले आहे, उसाला काही प्रमाणात उन्नी लागल्याने ऊस पिवळा पडू लागला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)