‘या’ दोन भारतीय जलदगती गोलंदाजांचा चाहता आहे डेल स्टेन !

जगातील सर्वोत्तम जलदगती गोलंदाजांपैकी एक डेल स्टेन हा सध्या ३५ वर्षाचा आहे.  वयाची पस्तिशी ओलांडली असली तरी त्याच्या गोलंदाजीत गती काही कमी झालेली नाही. एखाद्या २३ वर्षाच्या जलदगती गोलंदाजा लाजवेल अशी शारीरिक तंदुरुस्ती त्याने कमावली आहे.

बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अनेक गोष्टी मांडल्या. दक्षिण आफ्रिका संघासाठी खळेताना त्याला अजूनही विश्वचषक जिंकण्याची उमेद आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या दुखापतीतून सुखरूप बरा होऊन परत संघात स्थान मिळवणे आणि आपल्या नावाला साजेशी कामगिरी करणे, या गोष्टीसाठी तो स्वतःला सुदैवी समजतो.
भारतीय जलदगती गोलंदाजातील ईशांत शर्मा त्याचा आवडता भारतीय गोलंदाज आहे. “भारतातील खेळपट्ट्या जलदगती गोलंदाजांना जास्त मदत करीत नाहीत. तरीदेखील कसोटी क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करीत आहे”, असे तो म्हणाला.
जसप्रीत बुमराह याचे देखील त्याला कौतुक आहे. तो जगातील सर्व फलंदाजांची डोकेदुखी का ठरत आहे? याची त्याने मीमांसा केली. “त्याच्याकडे गती आहे, त्याची गोलंदाजीची शैली वेगळी आहे. तो तरुण आहे, यॉर्कर चेंडूंचा उपयोग तो उत्तमरीत्या करतो. आणखी काय हवंय? असे तो म्हणाला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
10 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)