जिन्ना-नेहरू विधानाबदल दलाई लामांनी मागितली माफी

नवी दिल्ली – तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी ‘नेहरू आणि जिन्ना’ यांच्याबदल एक विधान केले होते. या विधानाबदल त्यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, ‘जर त्या विधानात काही चुकीचे असेल तर मी माफी मागतो’.

दलाई लामा यांनी म्हटले की, माझ्या विधानामुळे अचानकपणे विवाद निर्माण झाला. जर काही चुकीचे विधान केले असेल तर मी माफी मागतो.

बुधवारी ‘गोवा इन्स्टीट्यूट आॅफ मॅनेजमेंट’ येथील एका कार्यक्रमा दरम्यान दलाई लामा यांनी दावा केला की, ‘महात्मा गांधी यांना असे वाटत होते की, मोहम्मद अली जिन्ना प्रधानमंत्री व्हावेत पण पंडित नेहरू यासाठी तयार नव्हते’. दलाई लामा यांनी म्हटले की, तेव्हा ‘प्रधानमंत्री होण्याच्या ईच्छेमुळे नेहरू यांनी आत्मकेंद्रित वृत्ती वापरली नसती तर आज देशाची फाळणी झाली नसती.’

विधानानंतर वाद निर्माण झाला होता. तर काॅग्रेसने म्हटले की, या ‘विधानामागे मोदी सरकारचा हात आहे’.  त्यानंतर दलाई लामा यांनी माफी मागितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)