भाग – १
दैनिक प्रभात घेवून येत अाहेत एक अागळावेगळा कार्यक्रम ज्याचं नाव अाहे “शब्दांच्या पलिकडले”. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक चित्रपट व नाट्यक्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिमत्वांना अापण भेटणार अाहोत व त्यांचे व्यक्तिमत्व ऊलगडण्याचा प्रयत्न करणार अाहोत.
या कार्यक्रमाची निर्मिती “मल्हार फिल्मस् अॅण्ड एन्टरटेन्मेंटस्” यांनी केली अाहे, तर दैनिक प्रभात प्रस्तूतकर्ते अाहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “एकता कपूर” यांनी केले असुन दिग्दर्शन “अादित्य कानेगांवकर” यांचे अाहे.
अवधूत गुप्ते प्रस्तुत आणि यशराज इंडस्ट्रीज यांची निर्मिती असलेला ‘गॅट मॅट’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार या पार्श्वभूमीवर चित्रपटातील कलाकारांसोबत खास गप्पा मारल्या आहेत. कॉलेजच्या कट्ट्यांवर घडणारी धम्माल ‘गॅट मॅट’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. शिवाय या सिनेमात अक्षय टंकसाळे, निखील वैरागर, रसिका सुनील आणि पूर्णिमा डे हे नव्या दमाचे आणि यशस्वी कलाकार पाहायला मिळत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा