“दै. प्रभात’तर्फे नवरंगाचा जागर

‘सेल्फी’ स्पर्धेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन

पुणे- येत्या बुधवारपासून नवरात्री उत्सव सुरू होणार असून, घटस्थापना करून देवीचा जागर करण्यात येणार आहे. “दै. प्रभात’ आपल्याला सोबत घेऊन रंगाचा जागर करणार असून त्यात आमच्या वाचकांनीही सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे. नऊ दिवसांच्या या रंगांच्या या जागरात महिला आणि पुरुषांच्या गटानेही सहभागी व्हावे, असे आवाहन “दै. प्रभात’तर्फे करण्यात येत आहे.

-Ads-

नवरात्रीतील रोजच्या रंगाचा पेहराव केलेला आपला वैयक्‍तिक अथवा “ग्रूप सेल्फी’ आपण आमच्या 9730359892/ 8657774030 या व्हॉट्‌स ऍप क्रमांकावर “सेन्ड’ करा. आपल्या कार्यक्षेत्रातील सहकारी किंवा, महाविद्यालयातील विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांचेही यामध्ये स्वागत आहे. “सेल्फी’ पाठवताना आपले संपूर्ण नाव पत्ता आणि संपर्क क्रमांक, अथवा ग्रूप असेल, तर त्यात सहभागी व्यक्‍तींची नावे, पत्ता त्यामध्ये नमूद करावा. उत्तम “सेल्फी’ “दै. प्रभात’मध्ये छापले जातील. तसेच सर्वोत्तम “सेल्फी’ असलेल्यांचा नवरात्रीनंतर सत्कारही करण्यात येईल. चला, तर मग तयार व्हा, आमच्यासोबत नवरंगाच्या या जागरात सहभागी होण्याला.

“सेल्फी’ पाठविताना घेण्याची काळजी
1. “सेल्फी’ घेताना पुरेसा उजेड असावा.
2. फोटो क्‍वालिटी उत्तम असावी.
3. अस्पष्ट फोटो घेतले जाणार नाहीत.
4. “सेल्फी’ पाठविणाऱ्याचे पूर्ण नाव आणि मोबाइल क्र. आवश्‍यक.
5. “सेल्फी’ एकदाच पाठवावा. दोन वेळा पाठविल्यास तो स्पर्धेतून बाद होईल.

वार, दिनांक आणि रंग
बुधवार – 10 ऑक्‍टोबर – निळा
गुरूवार – 11 ऑक्‍टोबर – पिवळा
शुक्रवार – 12 ऑक्‍टोबर – हिरवा
शनिवार – 13 ऑक्‍टोबर – करडा
रविवार – 14 ऑक्‍टोबर – केशरी
सोमवार – 15 ऑक्‍टोबर – पांढरा
मंगळवार – 16 ऑक्‍टोबर – लाल
बुधवार – 17 ऑक्‍टोबर – जांभळा
गुरूवार – 18 ऑक्‍टोबर – गुलाबी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
13 :thumbsup: Thumbs up
9 :heart: Love
0 :joy: Joy
2 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)