प्रेम वाचकांचे ; नाते ‘प्रभात’शी आपुलकीचे

पुणे - वाचकांचे प्रेम आणि विश्वासाच्या पाठबळावर पुण्याच्या सार्वजनिक जीवनातील मानबिंदू असलेल्या दैनिक प्रभात ने 89 व्या वर्षात दिमाखदार पदार्पण केले. नारायण पेठेतील कै. वा. ब. गोगटे प्रशालेच्या प्रांगणात रंगलेल्या कौतुक सोहळ्याचे नोबल हाॅस्पिटलचे कार्यकारी संचालक डाॅ. एच.के.साळे, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डाॅ.न.म.जोशी, प्रख्यात बांधकाम व्यावसायिक प्रमोद वाणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन संपन्न झाले. यावेळी प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सरव्यवस्थापक बी.एल. स्वामी व कार्यकारी संपादक अविनाश भट उपस्थित होते.
88 व्या वर्धापनदिनी रंगला ह्रदय सोहळा
-राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
-प्रभातला शुभेच्छा देत जपला ऋणानुबंझ

पुणे – पाहुण्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावरच काढलेली मनमोहक रांगोळी, सनईचे मंगल सूर, फुलांची आकर्षक सजावट आणि तितक्‍याच उत्साही वातावरणात दैनिक “प्रभात’ चा 88 वा वर्धापनदिन शनिवारी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. हजारो वाचकांच्या उपस्थितीत “प्रभात’ ने 89 व्या वर्षात दिमाखदार पदार्पण केले.

ध्येयनिष्ठ, व्यासंगी आणि विवेकी पत्रकारितेची कास धरत गेल्या साडेआठ दशकांहून अधिक काळ समाजोन्नतीचा वसा घेत “प्रभात’ने लाखो वाचकांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले आहे. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने असंख्य वाचकांनी “प्रभात’ वर शुभेच्छांचा वर्षाव करत आगामी वाटचालीस भरभरुन शुभेच्छा दिल्या. या स्नेहमेळाव्यास सर्वसामान्य वाचक ते समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीने चांगलाच रंग भरला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नारायण पेठेतील कै. वा. ब. गोगटे विद्यालयाच्या प्रांगणात या दिमाखदार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. पाहुण्यांच्या स्वागतासाठी आकर्षक कमान आणि भव्यदिव्य रांगोळया रेखाटण्यात आल्या होत्या. यानिमित्त “प्रभात’ च्या कार्यालयावरही आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. या शानदार सोहळयाचा प्रारंभ नोबेल हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. एच. के. साळे, पाटे डेव्हलपर्सचे प्रमोद वाणी, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी, यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. ” प्रभात’ चे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले.

यावेळी “प्रभात’ वर प्रेम करणाऱ्या असंख्य वाचकांनी आणि हितचिंतकांनी गोगटे प्रशालेचे प्रांगण अक्षरश: गर्दीने फुलून गेले होते. ही गर्दी उत्तरोत्तर आणखीनच वाढत गेली. एकमेकांना शुभेच्छा देत आणि अल्पोपहारांचा आस्वाद घेत गप्पांची मैफल रंगवत वाचकांनीही या सोहळयाचा मनमुराद आनंद लुटला. या अनोख्या आणि आनंददायी सोहळयात व्यापार, उद्योग, राजकीय, विधी, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा, जाहिरात आणि पत्रकारिता क्षेत्रातील नागरिकांनी ” प्रभात’ वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

प्रसिध्द सनाईवादक नितीन तुकाराम दैठणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरेल सनई वादनातून नाट्यगीते तसेच भक्तीसंगीताची सुरेल मैफल रंगवली. त्यांना बाबुराव धुमाळ (सनई), गणेश काळे (हार्मोनियम), नितीन शिंदे (चौघडा) आणि मोहन दैठणकर (पेटी) यांनी साथसंगत केली. त्यांच्या या सुरेल सनई वादनाने मैफिलित आणखीनच रंग भरला होता.

या शानदार सोहळयास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, अनंतराव गाडगीळ, डॉ. नीलम गोऱ्हे, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, नोंदणी उपमहानिरीक्षक चिंतामणी भुरकुंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, सिम्बॉयसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, अजिंक्‍य डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एकनाथ खेडकर, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, प्रसिध्द दिग्दर्शक प्रविण तरडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नरसिंह मित्रगोत्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) तेजस्वी सातपुते, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे, पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) अशोक मोराळे, सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, सह प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रशेखर चव्हाण, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी. जे. देशमुख, दि पूना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, फामचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा, आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष युवराज काची, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार, माजी अध्यक्ष ऍड. एन. डी. पाटील, ऍड. औंदुबर खुने पाटील, ऍड. मिलिंद पवार, ऍड. राजेंद्र उमाप, ऍड. बिपीन पाटोळे, ऍड. विकास ढगे, ऍड. राजेंद्र दौडकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि वाचकांनी ” प्रभात’ वर शुभेच्छांचा वर्षाव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)