खोसेवस्ती येथे दहीहंडी उत्साहात

नेवासाफाटा- तालुक्‍यातील सोनई येथील खोसे वस्तीवर असलेल्या अंगणवाडी क्रमांक 185 मध्ये बालगोपाळांनी उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी उत्सव साजरा केला. यावेळी अंगणवाडी सेविका मंदा काळे यांनी मुलांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्माची गोष्ट सांगितली व भारतीय संस्कृती व सणांच्या माध्यमातून विविधतेतुन एकता याचे दर्शन कसे घडते याविषयी पालकांना माहिती दिली.

यावेळी बालकांच्या हस्ते स्टुलवर उभे राहून दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी उपस्थित बालक व पालकांना दही काल्याच्या प्रसादाचे वाटप व खाऊचे वाटप करण्यात आले. शांता दरंदले यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)