नुकतीच पाकिस्तानाचा झेंडा घेऊन काढलेल्या फोटोमुळे ट्रोल झालेली बॉलीवूडची ड्राम क्वीन अर्थात राखी सावंत आता एका मानाच्या पुरस्काराने चर्चेत आली आहे. राखी सावंतला “दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट आयटम डान्सर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शनिवारी पुरस्कार दादासाहेब फाळके फाउंडेशनकडून तिला देण्यात आला.
गेल्या 12 वर्षांत विविध भाषांत मिळून जवळजवळ 100 आयटम गाण्यांवर राखीने डान्स केला आहे, पण तिला आजपर्यंत कोणताही पुरस्कार मिळाला नाही. म्हणूनच राखीला यावर्षी सर्वोत्कृष्ट आयटम डान्सर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पण या बातमीवर अजूनही तिच्या चाहत्यांना विश्वास बसत नाही. तर तिने हा पुरस्कार विकत तर घेतला नाही ना? अशी विचारणाही काहींनी केली. पण यावर, एवढा मोठा पुरस्कार विकत घेण्याची माझी कुठली औकात, असे राखीने उत्तर दिले. नुकत्याच आपल्या भोजपुरी आयटम नंबर नंतर, राखी मनमोहिनी या मालिकेत दिसून आली होती. त्यानंतर आता ती बॉक्स क्रिकेट लीग – सीझन 4 चे निवेदन करणार आहे. राखीला पहिल्यांदाच अशा प्रकारचा मानाचा पुरस्कार मिळाल्यामुळे तिलाही खूप बरे वाटत असेल.