#HBD सदाबहार अभिनेते दादा कोंडके यांची आज जयंती

मराठी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय अभिनेते दादा कोंडके यांची आज ८६ वी जयंती आहे. दादा कोंडके यांचे खरे नाव कृष्णा कोंडके असून त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३२ रोजी मुंबईतील नायगावमध्ये झाला. दादा कोंडके मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते व चित्रपट-निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या द्विअर्थी विनोदी संवादाने त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांच्या सर्वच भूमिकांनी त्यांना तुफान प्रसिद्धी मिळवून दिली.

‘अपना बाजार’मध्ये दरमहा साठ रुपये पगारावर कामाला असताना दादा सेवा-दलाच्या बँडमध्ये काम करू लागले. परंतु कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. विचित्र गाणी रचणे, त्यांना चाली लावणे हे त्यांचे फावल्या वेळेतले छंद. सेवादलात असतानाच त्यांची भेट निळू फुले, राम नगरकर यांच्याशी झाली. आणि दादा कोंडके सेवादलाच्या नाटकांमध्ये छोटी-मोठी कामे करू लागले. नंतर त्यांनी ‘खणखणपुरचा राजा’ यामधील भूमिका सोडून दादा कोंडके यांनी स्वत:चे कला पथक काढले व वसंत सबनीस-लिखित ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकातून दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. १९६९ साली दादा कोंडके यांनी भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर सोंगाड्या (१९७१), आंधळा मारतो डोळा (१९७३), पांडू हवालदार (१९७५), राम राम गंगाराम (१९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (१९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते. ‘सोंगाड्या’ ही दादा कोंडके यांची पहिली चित्रपट निर्मिती होती. यानंतर दादा कोंडके यांनी स्वत:च्या कामाक्षी प्रोडक्शन अंतर्गत १६ मराठी चित्रपट काढले. व विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे दादा कोंडके यांच्या नावाची गिनीज बुकात नोंद झाली. दादा कोंडके यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी व गुजराती भाषांमध्ये चित्रपटांची निर्मितीही केली.

-Ads-

१४ मार्च १९९८ रोजी पहाटे ३. ३० वाजता मुंबईतील रमा निवास या दादरच्या निवासस्थानी दादा कोंडके यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. दादा कोंडके यांच्या जीवनावर ”एकटा जीव” हे पुस्तकही लिहिण्यात आले होते.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)