निर्माता-दिग्दर्शक कबीर खान यांचा 1983 मधील विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणा-या भारतीय संघावर आधारित ’83’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंग या चित्रपटामध्ये भारतीय संघांचे माजी ‘कर्णधार कपिल’ देव यांची भूमिका साकारत आहे. तर, दुरीकडे अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील या चित्रपटात रणवीर बरोबर दिसून येणार आहे. चित्रपटात दिपीका कपिल देव यांची पत्नी ‘रोमी भाटीया’ यांची भूमिका साकारणार आहे. दीपिकाने या रोलसाठी तब्ब्ल 14 कोटी रुपये निर्मात्यांकडून घेतले आहे.
सध्या हिमाचल प्रदेशातील ‘धर्मशाला’ येथे रणवीर आणि त्याच्या संपूर्ण टीमचे ट्रेनिंग सुरु आहे. ‘83’ चित्रपटाचे शूटिंग सुरु होण्याआधीच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 10 एप्रिल 2020 मध्ये ’83’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहे.