पानसरे हत्याप्रकरणी हायकोर्टाचा मुख्यमंत्र्यांना झटका ; कार्यक्षमतेवर उपस्थित केले प्रश्‍नचिन्ह

मुंबई:  डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांसह मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. गृहमंत्रालयासारखे महत्वाचे खात्यांसह सुमारे 11 खाती हाताळता तर मग तशी कार्यक्षमताही दाखवा. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात का केवळ एका पक्षाचे नेते आहात ? असा प्रश्नही न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने उपस्थित केला.

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत या याचिकांवर आज न्यायमूर्ती एस.सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी.पी कोलाबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी आरोपींचा शोध घेण्यास अपयशी ठरलेल्या एसआयटीच्या कार्यपध्दतीवर तिव्र नाराजी व्यक्त करत चांगलेच धारेवर धरले.

कर्नाटकामधील गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या तपासातून महाराष्ट्रातील तपासयंत्रणांना इथं घडलेल्या हत्याकांडांचे धागेदोरे मिळतात हेच आर्श्‍चयकारक आहे. आपल्या राज्यात आणि शेजारच्या राज्यात वेगळ्या विचारसरणीचे सरकार आहे काय ? असा सवाल न्यायालयाने उपस्थित करून तपास यंत्रणांच्या कार्यक्षतेवर आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)