पुणे- अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अॅड. संजीव पुनाळेकर यांनी केलेल्या जामीन अर्जावर मंगळवारी (दि.11) सुनावणी होणार आहे. शुक्रवारी (दि.7) सीबीआयने म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितल्याने सुनावणीला पुढील तारिख पडल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील अॅड. धर्मराज चंडेल यांनी दिली.
गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल नष्ट करण्याचा सल्ला दिल्याने सीबीआयने बचाव पक्षाचे वकील अॅड. पुनाळेकर आणि लिपिक विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने सुरूवातीला दोघांना पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यावेळी अॅड. पुनाळेकर यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे.