#JAIvDEL : ‘दिल्ली दबंग’चा जयपूर पिंक पँथर्सवर विजय

नवी दिल्ली –  चांगल्या खेळाच्या सुरूवातीनंतरही जयपूर पिंक पँथर्सला दबंग दिल्ली विरूध्द विजय मिळविण्यात अपयश आले. दिल्ली दबंग संघाने जयपूर पिंक पँथर्सवर 40-29 ने विजय संपादित केला.

दिल्लीच्या संघाने पहिल्या सत्रात पिछाडीवर पडल्यानंतर दबंग खेळ करत जयपूरचे आव्हान सहजपणे परतावले. दिल्लीने दुसऱ्या सत्रात 20-16 अशी आघाडी घेतली. दिल्लीकडून नवीन कुमारने 10, मेराज शेखने 9 तर चंद्रन रंजीतने 8 गुणांची कमाई करत दिल्लीच्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)