डी. टी. एड्‌., डी. एल. एड अर्ज प्रक्रियेस सुरुवात

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या अध्यापक शिक्षण पदविका (डी. टी. एड्‌.) आणि प्राथमिक शिक्षण पदविका (डी. एल. एड्‌.) परीक्षांकरिता विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी 26 मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

राज्यातील डी. टी. एड्‌. व डी. एल. एड्‌.च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. राज्यात एकाच वेळी येत्या 6 ते 17 जून दरम्यान या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. वेळापत्रक परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सर्व अध्यापक विद्यालयांना नोंदणी करण्यासाठी 8 ते 12 मार्च दरम्यान मुदत देण्यात आली होती. नवीन रजिस्ट्रेशन केलेल्या अध्यापक विद्यालयांना ऍप्रूव्ह करणेही आवश्‍यक असते. अध्यापक विद्यालयांसाठी 2004 ते 2016 या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी बुधवारपासून सुरुवात झाली आहे. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याकरिता 27 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत मुदत देण्यात आली आहे. अतिविलंब शुल्कासह 3 ते 23 एप्रिल या मुदतीत अर्ज भरता येणार आहेत.

अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्यांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर परीक्षा केंद्र ऑनलाइन निश्‍चित करण्यासाठी 3 ते 9 एप्रिल या कालावधीत मुदत दिली आली आहे. प्राचार्यांनी केंद्रसंचालकांची यादी 10 ते 16 एप्रिलमध्ये ऑनलाइन निश्‍चित करून पाठवायची आहे. विद्यालयांना माहिती दुरुस्ती करण्यासाठी 24 ते 28 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण भरण्यासाठी 10 ते 15 मे दरम्यान मुदत दिली आहे. यानंतर अध्यापक विद्यालयांना 30 मे ते 6 जून या कालावधीत विद्यार्थ्यांची परीक्षा प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्यात सुमारे 625 अध्यापक विद्यालये सद्य:स्थितीत कार्यरत आहेत. या नियमित विद्यार्थ्यांसह 10 हजार रिपीटर विद्यार्थीही परीक्षेला बसणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)