जागतिक कॅडेट बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धा – गुकेश आणि सविताला सुवर्ण

नवी दिल्ली – भारताचे अांतरराष्ट्रीय मास्टर बुध्दिबळपटू गुकेश डी. आणि सविता श्री.बी. यांनी जागतिक कॅडेट बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे बारा वर्षाखालील खुल्या आणि मुलींच्या गटांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. ही स्पर्धा स्पेनमधील गॅलिसियामध्ये संपन्न झाली.

स्पर्धेत गुकेश 10 विजय आणि 1 पराभव अशी कामगिरी केली. त्याने 1.5 गुण फरकाने हा विजय संपादित केला. रूसचा मुर्जिन वोलडोर हा दुसऱ्यास्थानी तर अमेरिकेचा चैसिन निको हा तिसऱ्या स्थानावर राहिले. सविताने आठ विजय मिळवताना दोन लढती बरोबरीत सोडवल्या. उज्बेकिस्तानची अोमोनोवा उमिदा ही दुसऱ्या स्थानावर राहिली.

स्पर्धेत दोन सुवर्णपदकासह दुसऱ्या स्थानावर तर चीनचा संघ दोन सुवर्ण, एक ब्राँझसह पहिल्या स्थानावर राहिला. अमेरिकेचा संघ एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन ब्राँझ पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)