सायबर गुन्हे व संबंधित कायदे माहिती करून घ्या

न्या. पी. बी. सावंत यांचे प्रतिपादन

पुणे – न्यायपालिका हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे. त्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रासाठी त्याची निवड करून केवळ आपला चरितार्थ नव्हे, तर मानवतावादी विचार करून आपल्या व्यवसायाचा वापर सामाजिक समस्या सोडविण्यासाठी करावा. सायबर क्राईम सारखी आधुनिक क्षेत्रे समजून घेऊन कायद्याचे ज्ञान अद्यायावत ठेवावे, असे विचार न्या. पी. बी. सावंत यांनी व्यक्‍त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एमआयटी विश्‍व शांती विद्यापीठाच्या कॉमर्स, इकॉनॉमिक्‍स विभाग आणि स्कूल ऑफ लॉच्या नव्या तुकडीच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, कुलगुरू डॉ. आय. के. भट, अधिष्ठाता डॉ. श्रीहरी होनवाड, डॉ. महेश आबाळे, प्रा. डॉ. पौर्णिमा इनामदार, प्रा. चेतन भुजबळ उपस्थित होते.

पी. बी. सावंत म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात कायदेविषयक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कायद्याचे पदवीधर हे सिव्हील, क्रिमिनल, सरकारी, इंडस्ट्रीयल, फॅमिली, सायबर, कंज्यूमर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रात करियर करू शकतात. त्याचप्रमाणे इन्कम टॅक्‍स, ह्यूमन, चॅरिटी, कंपनी लॉ व कॉर्पोरेट लॉ या क्षेत्रात आपले भविष्य उज्ज्वल करता येते. तसेच डिजिटल युगात वाढत्या सायबर क्राइमच्या घटनांमुळे येथेही करियर करू शकतात.

कायद्याच्या क्षेत्रात सतत नवनव्या ज्ञानाची भर पडत असते. लॉचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभिजात वाड्‌मय व मानासशास्त्राचासुद्धा अभ्यास करावा. त्याने तुमच्या व्यवसायाला मानवतेची जोड मिळेल. वकिलीच्या कोणत्याही क्षेत्राचे तुम्ही सभासद असलात, तरी सामाजिक समस्या सोडविणे हाच तुमचा धर्म आहे.

डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, रोबोटिक्‍स, अॅॅनेलॅटिक्‍स आणि अॅॅप डेव्हलमेंट या तीन गोष्टींच्या आधारवर भविष्य निर्भर असेल. रोज बदलत जाणाऱ्या जगात फक्‍त तंत्रज्ञानच नाही, तर बिझनेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. ऑनलाईन बिझनेसमुळे भविष्यात तुमच्या खिशामध्येच सर्व बिझनेस असेल. त्यामुळे सर्वांना स्मार्ट बनावे लागेल. नवनवीन अॅॅप निर्मितीवर भर देऊन विद्यार्थ्यांनी उद्यमशील बनावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)