#CWC2019 : दुसरी सेमीफायनल देखील लो-स्कोरिंग; ऑस्ट्रेलिया सर्वबाद २२३

बर्मिंगहॅम – आज विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही दुसरी उपांत्य लढत देखील ‘लो स्कोरिंग’ ठरली असून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडसमोर विजयासाठी २२४ धावांचे आव्हान ठेवले आहे. प्रथम नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरोन फिंच याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी घराच्या मैदानावर भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकांमध्ये २२३ धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडतर्फे ख्रिस वोक्‍स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी ३ गाडी बाद केले तर जोफ्रा आर्चरने २ व मार्क वुडने १ गडी बाद केला.

एका बाजूने सतत विकेट्स पडत असताना ऑस्ट्रेलियातर्फे अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने ८५ धावांची संयमी खेळी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २०० पार पोहोचविण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तर यष्टीरक्षक अलेक्‍स केरीने देखील ४६ धावांची भर घातली.

अंतिम सामन्यांमध्ये प्रवेश कारण्यासाठी आता इंग्लंडला निर्धारित ५० षटकांमध्ये २२४ धावा बनवाव्या लागणार आहेत. तत्पूर्वी काल न्यूझीलंडने भारताचा पराभव करत अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे. आजच्या सामन्यामध्ये विजयी होणार संघ रविवारी न्यूझीलंडसोबत लढणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)