#CWC19 : वेस्टइंडीजचे अफगाणिस्तानपुढे ३१२ धावांचे आव्हान

हेडींग्ले – विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या अफगाणिस्तान आणि वेस्टइंडीज या दोन संघांदरम्यान आज सामना रंगला असून या सामन्यामध्ये वेस्टइंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्टइंडीजने निर्धारित ५० षटकांमध्ये ६ गड्यांच्या मोबदल्यात ३११ धावांचे आव्हान उभारले आहे. वेस्टइंडीजतर्फे एवीन लेविस (५८), शाई होप (७७), निकोलस पूरण (५८) यांनी अर्धशतकी खेळी केली. कर्णधार जयसन होल्डरच्या ३४ चेंडूत ४५ धावा आणि कार्लोस ब्रेथवेटच्या अखेरच्या ४ चेंडूंमधील १४ धावांमुळे वेस्टइंडीजला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला.

अफगाणिस्तानी गोलंदाजांनी फलंदाजीला प्रतिकूल असणाऱ्या खेळपट्टीवर देखील सुमार गोलंदाजी केल्याने कॅरेबियन फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)