भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्च्यांना सध्या उधाण आलं आहे. दरम्यान, याच मुद्यावरून जेष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी देखील सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे. धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा का होत आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.
As a middle order batsman or a WK M S Dhoni is a totally dependable n trustworthy. Virat is graceful enough to accept that Dhoni’s understanding of game is an advantage for the team .One can see that a lot of cricket is still left in Him . Why even talk about his retirement
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) July 12, 2019
“धोनी हा मधल्या फळीचा फलंदाज आणि तितकाच चांगला यष्टीरक्षक आणि विश्वासार्ह खेळाडू आहे. धोनीची या खेळाप्रती असणारी समज संघासाठी फायद्याची असल्याची बाब खुद्द विराटलाही मान्य आहे’, असं म्हणत धोनीमध्ये अद्यापही खूप सारं क्रिकेट शिल्लक आहे, ही बाब स्पष्ट करत येत्या काळातही त्याच्याकडून अफलातून खेळाची अपेक्षा करणं वावगं ठरणार नाही” असं त्यांनी म्हंटल आहे. यापूर्वी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सुद्धा धोनीच्या निवृत्ती विषयावर आपलं मतप्रदर्शन केलं होतं.