शत्रुघ्न सिन्हा आणि शाहनवाज हुसेन यांचा पत्ता कट 

पटना – लोकसभा निवडणुकींसाठी एनडीएने आज ४० जागांपैकी ३९ उमेदवार जाहीर केले. परंतु, एनडीएच्या यादीतून शत्रुघ्न सिन्हा यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांच्या जागी पटना साहिब येथून रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांना नवादा ऐवजी बेगुसराय येथून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. शाहनवाज हुसेन यांनाही यंदा भाजपने उमेदवारी नाकारली आहे.

दरम्यान, पटना साहिब येथून खासदार राहिलेले शत्रुघ्न सिन्हा यांना बंडखोरीची शिक्षा मिळाली असून त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी पटना साहिब येथून रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा भाजपाची साथ सोडत काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपच्या उमेदवारांची यादी येण्याआधीच पटना साहिबमधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)