तलवारीने केक कापला; एकास अटक, तिघे फरार

लातूर: रहदारीच्या रस्त्यावर वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे. तर तीन जण फरार झाले आहेत. लातूर येथील पशू वैद्यकीय दवाखान्यासमोरील रस्त्यावर मंगळवारी (दि. 22) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एका तरूणाच्या वाढदिवसानिमित्त केक मांडण्यात आला. यावेळी भररस्त्यात आरडाओरड करीत तीन फूट लांबीच्या तलवारीने केक कापण्यात आला.

ही बाब पोलिसांना लक्षात येताच शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी आदित्य देशमुख, विकास पवार, निलेश पवार व अमन अशा चौघा जणांच्या विरूद्ध शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय जाधव हे अधिक तपास करीत आहेत. या चौघाही जणांविरूद्ध भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा 4, 25 व मुंबई पोलीस कायदा 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)