सीमा शुल्क बुडविल्याप्रकरणी उद्योजकाला अटक

1 कोटी 7 लाखांचा कर : जीएसटी इंटेलिजन्सची कारवाई

पुणे – सौरउर्जा उपकरणात वापरण्यात येणाऱ्या आयात इव्हॅक्‍युएटेड ट्युबचे सीमाशुल्क बुडवून खुल्या बाजारात विक्री करून तब्बल एक कोटी सात लाख रुपयांचा सीमा शुल्क कर बुडविल्याप्रकरणी उद्योजकावर कारवाई करण्यात आली आहे. यात या उद्योजकाला जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाने सोमवारी (दि.30) रात्री अटक केली.

-Ads-

सिद्धकला रिन्युएबल एनर्जी सिस्टीम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विशाल कुंभारधरे (वय 38, रा.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या उद्योजकाचे नाव आहे. मुख्य न्यायदंडाधिकऱ्यांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

ही कारवाई द डायरेक्‍टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्सच्या पुणे विभागाच्या उपसंचालक वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी सुनील यादव आणि पांडुरंग देशमुख यांच्या पथकाने केली. कुंभारधरे यांची सौरउर्जेवरील पाणी तापविण्याचे यंत्र तयार करण्याची सिद्धकला रिन्युएबल एनर्जी सिस्टीम्स लिमिटेड ही कंपनी आहे. केंद्र सरकारकडून सौरउर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी उपकरणांमध्ये वापरण्यात येणारे इव्हॅक्‍युएटेड ट्युबचे सीमा शुल्क भरण्यासाठी सवलत दिलेली आहे. परंतु कुंभारदरे यांनी ती परदेशातून आयात करून त्याचे सीमाशुल्क न भरता उलट विक्री खुल्या बाजारात करून 1 कोटी 7 लाख रुपयांचा नफा कमविला होता. तसेच त्याचे व्यवहारांच्या नोंदी देखील ठेवल्या नाहीत. सीमाशुल्क कायद्यांचा भंग केल्याप्रकरणी तसेच सरकारचा महसूल बुडविल्याप्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी जीएसटीचा भरणा प्रामाणिकपणे करा, तसेच जे व्यावसायिक किंवा उद्योजक जीएसटीचा भरणा करीत नसतील, त्यांना देखील या प्रक्रियेत सामील होण्याचे आवाहन द डायरेक्‍टर जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्सकडून करण्यात आले आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)