उत्सुकता भविष्याची: 17 ते 23 डिसेंबर 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे

मेषेत हर्षल वक्री, कर्केत राहू, तुळेत शुक्र, वृश्‍चिकेत गुरु व बुध, धनूमध्ये रवी, शनी, प्लुटो, मकरेत केतू तर कुंभेत मंगळ व नेपच्यून आहेत. कामात कृतीवर जास्त भर राहील. एखादी सुवार्ता मन आनंदी करेल. नवीन ओळखीचा फायदा होईल. आरोग्य उत्तम राहील. आवडत्या गोष्टींमध्ये मन रमेल. प्रवास घडेल.


प्रवासाचे योग 

ग्रहांची अनुकूलता वाढत जाईल. तेव्हा कृतीवर भर जास्त राहील. व्यवसायात चांगली घटना व चांगली बातमी कळेल. मंगळ तुम्हाला कार्यमग्न ठेवेल. नवीन ओळखीचा लाभ होईल. नोकरीत कामानिमित्ताने प्रवासाचे योग येतील. घरात प्रियजनांचे बाबत झालेले गैरसमज दूर होतील. मुलांबाबत समाधानकारक राहाल. तरुणांना मनपसंद सहवास लाभेल. जीवनात नवचैतन्य लाभेल.
शुभ दिनांक : 18,19, 20, 21, 22, 23.

बढतीची शक्‍यता 

पैशाची सोंग घेता येत नाहीत हे लक्षात ठेवून कृती करा. मनावर संयम ठेवून महत्वाचे निर्णय घ्या. व्यवसायात भविष्यात लाभदायक ठरणारी कामे हाती घ्याल. हितचितकांची मदत कामात येईल. नवीन करारमदार होतील. नोकरीत कामात नवीन जबाबदारीमुळे सुविधा मिळतील. पगारवाढ, बढतीची शक्‍यता. घरात नवीन खरेदीचा आनंद मिळेल. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. प्रकृतीची चिंता मिटेल.
शुभ दिनांक : 17, 21, 22, 23 

मानसन्मानाचे योग 

केलेल्या श्रमाचे चीज होईल. त्यामुळे आनंद द्विगुणीत होईल. भावनेच्या भरात वाहून न जाता व्यवहार सांभाळा. व्यवसायात अपेक्षित काही अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. पैशाची सोय होईल. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमची महती कळेल. मानसन्मानाचे योग. कौतुकास्पद काम हातून घडेल. घरात चांगली बातमीने मन प्रसन्न होईल. सर्वांशी सलोख्याचे संबध ठेवा. तरुणांनी आत्मविश्‍वास बाळगू नये.
शुभ दिनांक : 17, 18, 19, 20, 23 

वाद टाळा 

खर्चाचे प्रमाण वाढेल तेव्हा वेळीच आळा घाला. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन करून कामांना प्राधान्य द्या. महत्वाची कामे स्वत: करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्या. नोकरीत बढाया न मारता हातातील कामे वेळेत बिनचूक पूर्ण करा. कुवत ओळखून कामे करा. घरात शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवून बोला. गैरसमजुतीने होणारे वाद टाळा. तब्येतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 17, 18, 19, 20, 23.

चांगली बातमी कळेल 

मनोबल उत्तम राहील. त्याचे जोरावर नवीन काहीतरी करण्याचा मोह होईल. व्यवसायात प्रगतीच्या संधी येतील. कामात व पैशाच्या बाबतीत बरकत राहील. आर्थिक ऊब मिळाल्याने कामात नवीन बदल करावेसे वाटतील परंतु करण्यापूर्वी निष्णात व्यक्‍तींचे मार्गदर्शन घ्या. कामाचा उत्साह वाढेल. नवीन हितसंबंध जोडले जातील. हेकेखोर वृत्ती सोडून सांमजस्याने मार्ग काढा. चांगली बातमी कळेल.
शुभ दिनांक : 18, 19, 20, 21, 22. 

निर्णय अचूक ठरतील 

बराच काळ मनात असलेली सुप्त इच्छा प्रत्यक्षात साकार झाल्याने आनंद मिळेल. व्यवसायात आवक जावक समान राहील. तरीही कामाचे समाधान मिळेल. कार्यपद्धतीत बदल घडवून उलाढाल वाढवण्यात यश मिळेल. नोकरीत अधिकाराची कक्षा ओलांडू नका. अपेक्षित ठिकाणी बदल किंवा बदली होईल. घरात कर्तव्याला प्राधान्य द्याल. तरुणांचे बाबतीत अनुकूल ग्रहमान राहील.
शुभ दिनांक : 17, 21, 22, 23. 

विवाह ठरतील 

सुसंधी मिळेल त्याचा लाभ घ्या. व्यवसायात प्रगतीचा टप्पा गाठाल. कामे मिळतील. त्यात बदल करून उलाढाल व फायदा मिळवाल. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सर्व आघाडयांवर सतर्क राहा. जोडधंद्यातून विशेष लाभ होतील. घरात वागण्याबोलण्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. व्यक्‍तीगत जीवनात आनंदाचे क्षण उपभोगाल. प्रकृतीमान सुधारेल. विवाहोत्त्सुकांचे विवाह ठरतील.
शुभ दिनांक : 18, 19, 20, 23. 

अनपेक्षित घटना 

तुमची जिद्द व चिकाटी तुम्हाला कामात यश मिळवून देताना उपयोगी पडतील. अशक्‍यप्राय कामात यश मिळवून कौतुकास पात्र ठराल. प्रतिष्ठा मिळवून देणारी कामे मिळतील. जुने प्रश्‍न धसास लागतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून केलेली कामे लाभ देतील. मानसिक व शारीरिक स्वास्थ टिकून राहिल्याने आचार विचारात बदल शक्‍य होईल. घरात इतरांची साथ मिळेल. अनपेक्षित चांगली घटना घडेल.
शुभ दिनांक : 17, 21, 22. 

खर्च वाढेल 

योग्य दिशा व मार्गदर्शनाचा लाभ होईल. माणसांची पारख करताना चुकू नका. व्यवसायात विश्‍वासार्हता पडताळून पाहा. मगच कामाची जबाबदारी व्यक्‍तींवर सोपवा. पैशाचे व्यवहारात चोख राहा. मैत्री व व्यवहार यांची गल्लत करू नका. नवीन करारमदार होतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत कामात गुप्तता राखा. बराच काळानंतर नवीन पद्धतीचे काम वाटयाला येईल. घरात महत्वाच्या घडामोडी घडून येतील.
शुभ दिनांक : 17, 18, 19, 20, 23. 

पैशाची चिंता मिटेल 

महत्वाच्या ग्रहांची साथ तुम्हाला गतीमान बनवेल.घेतलेले निर्णय अचूक आल्यामुळे प्रगती होईल. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्‍तींवर विसंबून न राहता स्वयंसिद्ध रहा. कामाचे नियोजन करून कामे पूर्ण करा. पैशाची चिंता मिटेल. प्रवासाचे योग येतील. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात इतर व्यक्‍तींचे सहकार्य मिळेल. गृहसौख्य लाभेल. चांगली बातमी कळेल. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ दिनांक : 17, 18, 19, 20, 21. 

वादविवाद टाळा 

विस्कटलेली कामाची घडी बसवण्यास योग्य काळ आहे. प्रयत्न व नशिबाची साथ मिळाल्याने कामे मार्गी लागतील. व्यवसायात ठरवलेले उद्दीष्ट पार पाडाल. ओळखीचा उपयोग होऊन कामे मिळतील. नोकरीत सहकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवा. विचारल्याखेरीज सल्ले देऊ नका. वरिष्ठांची मर्जी सांभाळा. घरात तडजोडीचे धोरण ठेवलेत तर आचार विचारात चांगला बदल
होईल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सुवार्ता कळेल.
शुभ दिनांक : 17, 18, 19, 21, 22, 23. 

प्रवासाचे योग 

सावध दृष्टीकोन ठेवून मार्गक्रमण कराल. यश मिळेल. व्यवसायात योग्य व्यक्‍तींची मदत मिळेल त्याचा लाभ घ्या. कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल वाढवा. पैशाची तजवीज होईल. नोकरीत हट्टी स्वभावामुळे नुकसान होण्याची शक्‍यता तरी कार्यभाग साधून कामे पूर्ण करा. कामानिमित्ताने दूरच्या प्रवासाचे योग. मोठ्या व्यक्‍तींची मोलाची मदत होईल. घरात महत्वाचे निर्णय होतील. खरेदीचे योग.
शुभ दिनांक : 17, 18, 19, 20., 21. 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)