उत्सुकता भविष्याची…(13 ते 19 ऑगस्ट 2018 पर्यंतचे ग्रहमान खालीलप्रमाणे)

अनिता केळकर
लग्नी हर्षल वक्री, चतुर्थात रवी, राहू, बुध वक्री,षष्ठात शुक्र, सप्तमात गुरु, भाग्यात शनी व प्लुटो वक्री, दशमात मंगळ वक्री व केतू तर लाभात नेप्च्यून वक्री आहे. सप्ताहात अचूक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरेल. नवीन कामे मिळतील. आर्थिक स्थितीही समाधानकारक राहील. वेळ मजेत जाईल. प्रियजनांच्या सहवासात वेळ जाईल.
मेष: प्रवास योग
मंगळासारखा आक्रमक ग्रह तुमचा राशी स्वामी असल्याने व्यवसायात अचूक घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. नवीन कामे मिळतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कामानिमित्ताने प्रवास योग, वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्व कळून येईल. मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी आळशीपणा झटकून अभ्यासाला लागावे. यश हमखास मिळेल.
शुभ दिनांक : 13, 16, 17, 18वृषभ: विशेष कमाई
व्यवसायात रेंगाळलेली कामे हाती घेऊन पूर्ण कराल. कामात कार्य तत्पर राहाणे आवश्‍यक. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून जेवढा फायदा मिळवता येईल तेवढा मिळवा. नोकरीत तुमच्या कामामुळे तुम्हाला व तुमच्या शब्दाला मान मिळेल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. तरुणांनी अतिसाहस टाळावे. विद्यार्थ्यांनी यश मिळवण्यासाठी मनाची एकाग्रता ठेवावी.
शुभ दिनांक : 13, 14, 15, 19

मिथुन: अचानक धनलाभ
तुम्हाला पूरक असे ग्रहमान लाभल्याने कौटुंबिक स्वास्थ्य मिळेल. व्यवसायात प्रगतीस अनुकूल काळ आहे. आर्थिक उलाढाल वाढेल. महत्वाचे करारमदार होतील. नोकरीत टाळता न येणाऱ्या जबाबदाऱ्या वाढतील. नातेवाईक आप्तेष्ट यांच्या सहवासाने वेळ मजेत जाईल. तरुणांना नवीस सहवासाचे आकर्षण वाटेल. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.
शुभ दिनांक : 13,14, 15, 16, 17

कर्क: खर्चाचे प्रमाण वाढेल
कामात नवीन आव्हाने स्वीकारून ती तडीस नेण्याचा मानस असेल. व्यवसायात बदल करताना मोठी गुंतवणूक करावी लागेल. त्यासाठी योग्य व्यक्‍तींचा सल्ला घ्या. नोकरीत इतरांना न जमलेले काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील. महिलांचा आत्मविश्‍वास वाढेल. प्रियजनांसमवेत छोटीशी सहल काढाल. मुलांच्या मागण्या व हट्ट पुरवाल.
शुभ दिनांक : 13, 14, 15, 16, 17

सिंह: चांगल्या घटना घडतील
ग्रहमान व वातावरणाची उत्तम साथ मिळाल्याने उत्साह ओसंडून जाईल. व्यवसायात अनपेक्षित चांगल्या घटना घडतील. नोकरीत भावनेच्या भरात जादा कामे ओढवून घेऊ नका. बेकारांना नोकरी मिळेल. घरात नवीन वाहन, वस्तूंची खरेदीत महिलांचा बराच वेळ जाईल. पाहुण्यांची ये-जा राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.
शुभ दिनांक : 13, 14, 15, 16, 17

कन्या: दगदग टाळा
जीवनात एक नवा दृष्टीकोन ठेवून कामाला लागाल. तुमची झालेली कुचंबणा नाहीशी होईल. व्यवसायात नवीन कामे मिळतील. आर्थिकस्थिती समाधानकारक राहील. नोकरीत कामानिमित्ताने प्रवास. नवीन हितसंबंध जोडले जातील. सहकाऱ्यांवर फारसे विसंबून राहू नका. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. दगदग, धावपळ टाळावी.
शुभ दिनांक : 14,15,16,17,18,19

तूळ: अनपेक्षित लाभ
व्यवसायात विस्तार करून उलाढाल व फायद्याचे प्रमाण वाढवाल. बॅंका व हितचिंतक यांची मदत खेळते भांडवल उभे करताना होईल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कामे हातावेगळी कराल. वरिष्ठ व सहकारी कौतुक करतील. अंगी असलेल्या प्राविण्याचा उपयोग करून यश संपादन कराल. महिलांनी घरातील वादविवाद टाळावेत व आवडत्या छंदात मन रमवावे.
शुभ दिनांक : 13, 16, 17, 18, 19

वृश्चिक: सुवार्ता कळेल
ग्रहमान संमिश्र फळ देईल. तुमच्या अंगी असलेल्या कौशल्याला भरपूर वाव मिळेल. व्यवसायात आधुनिकीकरण करून नवीन विचारांचा अवलंब कराल. प्रगतीचा वेग समाधानकारक राहील. नवीन आर्थिक गुंतवणूक करणे गरजेचे होईल. “शब्द हे शस्त्र आहे’ हे लक्षात ठेवा. सलोख्याचे संबंध प्रस्थापित करा. सुवार्ता कळेल. प्रकृतीमान चांगले राहील.
शुभ दिनांक : 13, 14, 15, 16

धनु: जोडधंद्यात फायदा
तुमच्या जिद्दी व प्रयत्नवादी स्वभावाचा फायदा होईल. व्यवसायात कामात बदल करून नवीन उत्पन्नाचे साधन शोधाल. जुनी येणी वसूल होतील. जोडधंदा फायदा मिळवून देईल. घरातील महिलांच्या शब्दाला मान मिळेल. रेंगाळलेले प्रश्‍न तडीस लागतील. विद्यार्थ्यांनी चिकाटी धरून अभ्यास करावा. यश हमखास मिळेल.
शुभ दिनांक : 13,14,15,16,17,18

मकर: मोफत सल्ला टाळा
युक्‍ती आणि शक्‍तीचा वापर करून व्यवसायात यश संपादन कराल. योग्य व्यक्‍तीची निवड योग्य कामासाठी कराल, कौशल्याचा वापर करून अभिनव धाडस कराल. पूर्वी लांबवलेले बेत व आर्थिक कामे गती घेतील. नोकरीत तुम्हाला वरिष्ठांचे विचार जरी पटले नाहीत तरी प्रतिउत्तर देऊ नये. महिलांनी घरातील मोठ्यांचा सल्ला महत्वाचे निर्णय घेताना घ्या.
शुभ दिनांक : 14, 15, 16, 17, 18

कुंभ: आत्मविश्‍वास वाढेल
अनुकुल ग्रहमान व वातावरणाची साथ मिळेल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मनाविरुद्ध जाऊन मोठी कामे करावी लागतील. त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. वसुलीकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांची तुमचेकडून बरीच अपेक्षा राहील. महिलांचा वेळ आवडत्या छंदात जाईल. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगतील.
शुभ दिनांक : 13, 16,17, 18, 19

मीन: लवचिक धोरण ठेवा
कामातील प्रगतीचा आलेख चढत जाईल. त्याचा आनंद मिळेल. आर्थिक स्थितीही उत्तम असेल. व्यवसायात बाजारातील चढउतारांकडे लक्ष द्या. त्याप्रमाणे कामात लवचिक धोरण ठेवा. नोकरीत विनाकारण होणारी धावपळ कमी होईल. कामात बदलाची शक्‍यता. बेकारांना नवीन कामाची संधी. खर्च वाढेल. विद्यार्थ्यांना अनुकुल ग्रहमान.
शुभ दिनांक : 14, 15, 19

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)