इटानगरमध्ये संचारबंदी; परिस्थिती नियंत्रणात 

इटानगर – रविवारी झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीच्या पार्श्‍वभुमीवर इटानगरमध्ये लष्कराकडून गस्त घातली जात आहे. या हिंसाचारानंतर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीला स्थानिकांकडून विरोध होत आहे. पण कालनंतर हिंसाचाराची कोणतीही नवीन घटना घडलेली नाही.

दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव उपमुख्यमंत्री चाव मेन यांना नामसाई जिल्ह्यात हलविले आहे. त्याठिकाणीही त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काल आंदोलकांनी मेन यांचे खासगी घर आणि काही वाहने पेटवून दिली होती. संचारबंदीच्या वेळी लष्कराचे जवान हिंसाचार रोखण्यासाठी शहरात गस्त घालत आहेत. सध्या लष्कराचे 1 हजार जवान इटानगर मध्ये दाखल झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अरुणाचल प्रदेशमध्ये 6 आदिवासी समुदायांना स्थायी निवासी प्रमाणपत्र देण्याच्या प्रस्तावाविरोधात मोठे आंदोलन सुरू असून या आंदोलनादरम्यान जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात दोन नागरिकांसहित आणखीन एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)