पीवायसी करंडक : क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाची आगेकुच

पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा

पुणे – क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने डेक्कन जिमखाना संघाचा पराभव करत येथे सुरु असलेल्या पीवायसी हिंदु जिमखाना क्‍लब यांच्या तर्फे पीवायसी करंडक 14 वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकुच केली. डेक्कन जिमखाना मौदानावर येथे झालेल्या या सामन्यात विवेक टिपरेच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 59 धावांनी दणदणीत पराभव केला.

-Ads-

प्रथम फलंदाजी करताना क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने 43.5 षटकात सर्वबाद 178 धावा केल्या. यात क्रिश शहापुरकरने 33, सुजल देशमुखने 16 व अथर्व जठारने 20 धावा करत विवेकला सुरेख साथ दिली. डेक्कन जिमखाना संघाने आपल्या गोलंदाजीने चांगलाच दबाव निर्माण केला.

178 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघानेही आपल्या गोलंदाजीने डेक्कन जिमखाना संघावर सुरूवातीपासुनच दबाम निर्माण केला व साहिल कड व रिध्देश बुरुक यांच्या अचूक गोलमजीपुढे डेक्कन जिमखाना संघ केवळ 41.4 षटकात सर्वबाद 119 धावांत गारद झाला. साहिल कडने 3, रिध्देश बुरुक , पार्थ कांबळे व हितेश यादव यांनी प्रत्येकी 2 तर देवदत्त शिंदेने 1 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. 53 धावा करणारा विवेक टीपरे सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक:  साखळी फेरी:

क्‍लब ऑफ महाराष्ट्र – 43.5 षटकांत सर्वबाद 178 (विवेक टिपरे 53, क्रिश शहापुरकर 33, सुजल देशमुख 16, अथर्व जठार 20, वेदांत सणस 3-30, सर्वेश सुर्वे 2-21, आदित्य कुलकर्णी 2-42, करण जोगावडे 1-21, अविनाश जी 1-11, अथर्व सणस 1-34) वि.वि डेक्कन जिमखाना – 41.4 षटकांत सर्वबाद 119 (सर्वेश सुर्वे 33, वेदांत सणस 19, रितेश रजक 19, उदय पवार 15, साहिल कड 3-17, रिध्देश बुरुक 2-11, हितेश यादव 2-31, पार्थ कांबळे 2-16, देवदत्त शिंदे 1-10)

सामनावीर- विवेक टीपरे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)