कफ सिरपसह पेन किलरवर येणार बंदी? 

ड्रग ऍडवायजरी बोर्डच्या उपसमिती शिफारशी 
पुढील आठवड्यात अधिसूचना जारी होण्याची शक्‍यता 
नवी दिल्ली- केंद्र सरकार कफ सिरपसह विविध पेन किलरवर बंदी आणण्याच्या तयारीत आहे. देशातल्या सर्वोच्च अशा ड्रग ऍडवायजरी बोर्डच्या उपसमितीच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार निर्णय घेण्याचा विचार करत आहे. देशभरातल्या जवळपास 343 औषधांवर आरोग्य मंत्रालय बंदी घालण्याची शक्‍यता आहे.

या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय औषध कंपन्यांसोबत पिरामल, मॅक्‍सिऑड्‌स, सिप्ला आणि ल्यूपिनसारख्या घरगुती औषध निर्मात्या कंपनीच्या औषधांवर प्रभाव होणार आहे. याबाबत पुढील आठवड्यात अंतिम अधिसूचना जारी होण्याची शक्‍यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे. या निर्णयाविरोधात औषध कंपन्या न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय आरोग्य मंत्रालय डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल यासारख्या 343 औषधांवर बंदी घालण्याची शक्‍यता आहे. वेदनाशामक आणि फ्लू शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्‍यता वर्तवली जाते आहे. ही औषधे फिक्‍स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या औषधांवर बंदी घातली जावी म्हणून एका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उपसमितीने शिफारस केली आहे.

ड्रग टेक्‍नॉलॉजी ऍडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसींनुसार कोणकोणत्या औषधांवर बंदी घालायची त्याची यादी तयार करण्यात आल्याचे समजते आहे. सर्वोच्च न्यायालयाने डीटीएबीला सांगितले होते की, आरोग्य मंत्रालयाला ही यादी सोपवा की कोणती औषधे रेग्युलेट, रेस्ट्रिक्‍ट किंवा पूर्ण बंद करायची आहेत. त्यानुसार 343 औषधांची नावे डीटीएबीने दिल्याचे समजते आहे.

फिक्‍स्ड डोस कॉम्बिनेशन अर्थात एफडीसी औषधांवर बंदी घालण्यात यावी, असा मुद्दा केंद्राने उपस्थित केला होता. त्यानंतर कंपन्या आणि सरकार यांच्या वादात सुप्रीम कोर्टाने डीटीएबीला औषधांची यादी तयार करण्याची सूचना दिली होती.

“एफडीसी’ म्हणजे काय? 
कोणत्याही आजारावर उपचार म्हणून वापरण्यात येणारी औषधे जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त प्रकार एकत्र करून तयार केली जातात. त्यामुळे ते औषध घेण्याची मात्रा (डोस) ठरलेली असते. म्हणून अशा औषधांना फिक्‍स्ड डोस कॉम्बिनेशन म्हटले जाते. सध्या तयार करण्यात आलेल्या यादीत पॅरासिटामोल+फ्रेनिलेफ्राइन+कॅफेन+क्‍लॉरेफेनिरामाइन मॅलिएट+कोडाइन सिरप अशा प्रकरांमध्ये तयार करण्यात येणाऱ्या औषधांचा समावेश आहे. तर पॅरासिटामोल+प्रॉपिफेनाजोन+कॅफेन हे तीन घटक वापरल्या जाणाऱ्या कॉम्बिनेशन ड्रग्जचाही समावेश आहे.
———————————————————————————————


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)