#IPL2019 :अखेरच्या षटकात चेन्नईचा विजय

सामनावीर – शेन वाॅट्सन

नवी दिल्ली -महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 147 धावांची मजल मारली व चेन्नईसमोर विजयासाठी 148 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. दिल्लीने ठेवलेल्या 148 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने पहिली विकेट स्वस्तात गमावली. अंबाती रायडु 5 धावा करून माघारी परतल्यानंतर सलामीला आलेल्या शेन वॉट्‌सनने सुरेश रैनाच्या साथीने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये षटकांत 70 धावांपर्यंत मजल मारली.

वॉट्‌सनने 44 धावा केल्या. त्याला अमित मिश्राने बाद करत दिल्लीला दुसरा बळी मिळवून दिला. वॉट्‌सनप्रमाणेच सुरेश रैनाही सेट होऊन बाद झाला. त्याने 16 चेंडूत 30 धावांची आक्रमक खेळी केली. त्यानंतर जाधव आणि धोनीने सावध फलंदाजी करत चेन्नईला विजयासमीप नेले. विजयासाठी 2 धावा राहिल्या असताना जाधव 27 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या ब्राव्होने चौकार मारत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. यावेळी चेन्नईने 19.4 षटकांत 4 बाद 150 धावांची मजल मारली. तत्पूर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉने 5 चौकारांच्या मदतीने 16 चेंडूत 24 धावा फटकावल्या.

शॉ बाद झाल्यानंतर दिल्लीची धावगती मंदावली. कर्णधार श्रेयस अय्यरने संथ सुरुवात केली. तर शिखर धवनने बॉल टू रन करत धावफलक हलता ठेवला. त्यातच अय्यरला ताहीरने पायचित बाद करत दिल्लीला दुसरा धक्‍का दिला. यावेळी, मंदावलेली धावगती वाढविण्यासाठी ऋषभ पंतने फटकेबाजी करत दिल्लीची धावगती वाढविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी पंतने 25 धावांची आक्रमक खेळी करत दिल्लीला शतकी वेस ओलांडून दिली. पंत बाद झाल्यानंतर शिखरने मोठे फटकेबाजी केली. मात्र, आपले अर्धशतक झळकावल्यानंतर लागलीच तो देखील बाद झाला. यावेळी धवनने 51 धावांची खेळी केली. अक्षर पटेल आणि राहुल तेवतिया यांनी दिल्लीला 147 धावांची मजल मारून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)